STORYMIRROR

Rohit Khamkar

Fantasy Inspirational

3  

Rohit Khamkar

Fantasy Inspirational

परिवार

परिवार

1 min
245

कारण काहीही असो, सोन्याचा दिस तो आला.

आनंदाचे काही क्षण, नकळत देऊन गेला.


जगण्याच्या या स्पर्धेत, धावत आहेत सगळेच.

कामासाठी परक्यांच्या गाठी, भेटत नाही घरचेच.


सगळ्यांचा वावर वेगळा, ठिकाणं मात्र एकच.

रात्रीचे जेवण फक्त एकत्र, मोठ्यांची असते वचक.


नाती सगळी तशीच आहेत, थोडी गंमत हरवलीय.

प्रगतशील बनन्याच्या नादात, आयुष्याची जिरवलीय.


परत ते दिवस आले, वाटलं बालपण आलं.

या स्वर्गसुखासाठी, कारण संकट झालं.


सगळ्यांन सोबत वेळ घालवताना, आनंद एवढा होतोय.

आता पर्यंत साठवलेला सगळा, थकवा निघून जातोय.


थांबलं सगळं बंद आहे, सगळ्यांचाच तो कारोभार.

सगळ्या दुःखात एकच आनंद, खूप दिवसांनी एकत्र आला परिवार.


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Fantasy