परीराणी
परीराणी
गोड परीराणी माझ्या
रोज स्वप्नात येते
हात धरुन माझा
उंच आकाशात नेते
ढगांवर तरंगताना
पिसासारखे वाटते
थंडी वाजताच मला
घट्ट मिठीत घेते
वाढदिवसाला माझ्या
गोड गप्पा मारते
गोळ्या चाॅकलेट
माझ्या उशाशी ठेवते
अशी परीराणी
आभाळात असते
मला खाऊ देते
ती खूप खूप आवडते
