परीक्षेचे क्षण
परीक्षेचे क्षण
आजही आठवण आहे,
त्या परीक्षेच्या दिवसांची..
अन् कित्येक रात्री जागरण,
करून केलेल्या अभ्यासाची..
ट्यूबलाईटच्या प्रकाशात,
गॅलरीत एकटी बसायची..
कधीच भीती वाटली नव्हती,
त्या काळोख्या रात्रीची..
गर्द काळरात्र सरून,
नव्या दिवसाची सुरुवात व्हायची..
मात्र माझ्या बाबांची गॅलरीत,
चटईवर सावध झोप असायची..
त्रास करून घेऊ नकोस,
फक्त पास हो म्हणणाऱ्या बाबांची..
फर्स्ट क्लासच्या उत्साहाने,
कौतुकाची दवंडी गावभर पेटायची...
