प्रगती
प्रगती
कुणी प्रगतीसाठी तर, कुणी चैनीसाठी वाट धरली.
पैश्यांअभावी आजही, गरज आहे तिथेच सोय वारली.
महत्व तेव्हाच आहे, जेव्हा वापर उपयोगी होईल.
काळाची गरज आहे तीच यंत्रणा, तरुणांना नवीन व्यसन देईल.
व्यसन ते काय, जिथे आचार विचार वागणूक बदलेल.
तंत्रज्ञानालाच चुनका लागलाय, स्वतः मी कधी सुधारेल.
म्हणून किंमत कमी आहे, गरजूनीं सीमा पार केली.
गाव गल्ली खेडे पाड्यात, विदेशवाऱ्या आणी चंद्रवारी रंगली.
योग्य वापर करणाऱ्यांनी, मिळवले तत्पर ज्ञान.
बाकीचे मात्र उगाच, झीजवत बसलेत कान.
वरदान मिळाले एक, तेव्हा ताकत वाढली माणसाची.
योग्य हाती ठेवा तंत्रज्ञान, नाहीतर आफत येईल सगळ संपण्याची.
