प्रेरणा
प्रेरणा
कुणी वाजविली टाळी
तर कुणी थाळी वाजविली
आवाज घुमला आसमंतात
काम करणाऱ्या हाताला एक
नवी प्रेरणा मिळाली
कामाचे कौतुक करण्याची
गरज असते त्यांना टाळ्यांची
टाळी असते नव्या प्रेरणेची
टाळी असते शाबासकीची
टाळी तेव्हाच वाजविली जाते
जेव्हा मन हे आनंदून जाते
कामाला नसते जात कोणते
चांगले काम कधी लपत नसते
