प्रेमपत्र
प्रेमपत्र
पत्र तुझे सख्या येता
रोमांचित तनमन
पत्रपेटी बघताच
सैरभैर माझे मन
हाती गुलाब पाकळ्या
तुझे गुपित जाणले
कुठे अन् कशी वाचू
काही मज नुमजले
गेले गच्चीत खुशीत
प्रेमपत्र पारायण
पिसापरि माझे मन
गेले तंद्रीत रमून
हात ठेवी खांद्यावर
दादिटला खोडकर
दचकले मनोमन
घाबरली वेडसर
बभ्रा नको करु दादा
गोड गुपित आमुचे
वेळेवर सांगू सारे
चिडीचूप रहायचे
तरीसुद्धा झाला बभ्रा
आले बाबांच्या लक्षात
शुभ मंगल जाहले
दादा हसतो गालात
