प्रेमळ झोप
प्रेमळ झोप
उठल्यापासून धावपळीत
कसातरी सुरू होतो दिवस,
कामाच्या नादात
कशीतरी संपते दुपार,
गारवा घेऊन येते मग
प्रेमळशी संध्याकाळ,
या सगळ्यांनाच देऊन निरोप
रात्र घेऊन येते माझी प्रिय झोप.
माझी प्रिय झोप
मला कुशीत घेणारी,
थकलेल्या शरीराला
आराम देणारी.
मला स्वप्नांच्या जगात
दूर दूर नेऊन,
रोज एका नव्या जगाची
सैर करवणारी,
कित्येक सार्या नवनव्या
गोष्टींच्या जवळ आणणारी.
माझी प्रेमळ झोप,
माझी प्रेमळ झोप.
