प्रेमाची गोड गाणी...
प्रेमाची गोड गाणी...
लाज फुलली गाली ,
माझ्या लग्नाची तैयारी ,
आज घडी विवाहाची आली ,
येते माझ्या उरात दाटूनी ,
बालपणीच्या उंबरठ्याची वाणी ,
ही रित जिवघेणी तरी दिवाणी ,
मनात फुलते प्रेमाची गोड गाणी ...
सुख स्वप्न नवे अन् नवे जग हे भासे ,
तो राजा माझा मी त्याची राणी ,
नव्या स्वप्नांत रंगले जग हे,
फुटली पंख मला उडणारी ,
कोवळ्या कोवळ्या स्वप्नाची ,
सांगते एक कहाणी ,
सनई चौघडा अक्षताने ,
झाली पुन्हा नात्यांची बांधणी ,
ही रित जिवघेणी तरी दिवाणी ,
मनात फुलते प्रेमाची गोड गाणी ...
हात सजले मेंदीनी ,
सुगंध सजणावरी दरवळणारी ,
भाव अनामिक मनात दाटूनी ,
डोळा येते पाणी ,
आई वडीलांची मी बाहूली ,
भातुकली मांडणारी ,
पदार्पण करणार संसारी,
हळदीने अंग माखुनी ,
सजली शालु चुडयांनी ,
पारिजात दारी फुलूनी,
दरवळतो दुसऱ्यां अंगणी ,
ही रित जिवघेणी तरी दिवाणी ,
मनात फुलते प्रेमाची गोड गाणी ...

