प्रेम
प्रेम
खऱ्या प्रेमाचा सुगंध
नाही कधीच लपत..!
स्पर्श मनाशी मनाचा
नाही अंतर उरत..!!
कोणी दूर असूनही
खूप जवळ असतं..!
कोणी जवळ असूनही
कधी जवळ नसतं..!!
प्रेम असतं सुंदर
त्याला जपावं लागतं..!
ओल्या मनाच्या मातीत
प्रेम रुजवावं लागतं..!!
हळुवार होणारी रिमझिम
सरी कोसळणारी पावसाची..!
अलगद गारव्याचा स्पर्श
हिरवळ जणू श्रावणाची..!!
नदिस भेटण्या आतुर
प्रेम वाहणारा झरा..!
उन्हातून चालताना
प्रेम हळुवार वारा..!!