STORYMIRROR

सुरेश पवार

Abstract Tragedy

3  

सुरेश पवार

Abstract Tragedy

प्रेम विरह

प्रेम विरह

1 min
301

प्रेमाच्या विरहामध्ये,

सांज सांज जागते,

कधी येशील साजणा,

सारी रात जागते.।।।१।।।


आठवून साठवून,

डोळ्याचं पाणी आटते,

पापण्यांना आली लाली,

हुंदका भरून दाटते.।।।२।।।


वेशीवर उभी राहुनी,

आस लावून बसते

दूर देशी गेलास तू,

वाट बघत रुसते.।।।३।।।


का दिलेस अश्रुधारा,

का केलंस प्रेमझरा,

होती मी माझी एकटीच,

का अर्ध्यावर सोडलस जगभरा.।।।४।।।


सजले मी तुझ्यासाठी,

जगते मी तुझ्यासाठी,

एकदा तुला पाहुदे,

जगणार मी तुझ्यासाठी.।।।५।।।


सर्वस्वी मी अर्पण केले,

का मजला सजा देतोस,

आहे मी तुझी आयुष्याची संगिनी,

माझ्या प्रेताला जागा देतोस.।।।६।।।


शेवटची करते विनवणी,

आहे मी जन्मभरची स्वर्ग

दोन शब्द प्रेमाचे बोल,

यातच मिळेल सारा स्वर्ग.।।।७।।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract