STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे

1 min
2.7K


प्रेम हे देऊळ  असतं

आकर्षणाचं मोहोळ असतं

प्रेम हे पाप नसतं

त्यास  काही माप नसतं

 

प्रेम हे चंचल  असतं

जीवनदायी कुटुम्बवत्सल असतं

प्रेम हे  अनमोल  असतं

पक्ष्याप्रमाणे कलंदर असतं

 

प्रेम म्हणजे सप्तसुरांचं झंकारणं

दोन जिवांचं मधुर मिलन

प्रेम म्हणजे आकाश धरतीचं मिलन

प्रेम म्हणजे  सरितेचं सगरात विलिन होणं

 

प्रेम हे सोप  नसतं

ते अगदी निकोप असतं

प्रेम हे एक कोडं असत

आडिच अक्षरात  अवघं विश्वच सामावतं

 

                       

 

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational