प्रेम असून एकटी
प्रेम असून एकटी
त्याने माझ्यावर खूप प्रेम ,
दर्शविले तो प्रियकर झाला,
मी प्रियसी झाले का ?
माहित नाही l
त्याने लग्न करशील का?,
विचारले मी हो म्हटले ,
तो नवरा झाला,
मी बायको झाले का?
माहित नाही l
त्याने मला स्त्रीत्व दिले,
माझे विश्व बदलले,
तो पुरुष झाला,
मि स्त्री झाले का ?
माहित नाही l
💞त्याने माझा जॉब बंद ,
. केला मी घरात बसले,
तो मुक्त फिरत राहिला,
मी बंदिस्त झाले का ?
माहित नाही l
त्याने राणी सारखे तुला,
सुखात ठेवतो म्हणले,
तो राजा झाला,
. मी राणी झाले का ?,
माहित नाही l
त्याने पुरुषार्थ गाजवला,
मला मातृत्व मिळाले,
तो बाबा झाला,
मी आई झाले का ?
माहित नाही l
त्याने संसारात अडकवून,
माझ्या सर्व आवडीनिवडी बंद,
झाल्या,तो आनंदात रमला,
मी सुखी झाले का ?
माहित नाही l
त्याने खूप पैसा अडका,
कमावला तो वरिष्ठ गेला,
तो श्रीमंत झाला,
मी गरीबच राहिले का ?
माहित नाही l
त्याने खूप मान सन्मान ,
मिळवला ,ताठ मानेने,
जगला ,तो महान झाला,
मी लहानच राहिले का ?,
माहित नाही l
त्यांनी मुलांसाठी खूप कष्ट,
मेहनत घेतली असे तो सारखे,
म्हणायचा ,तो चांगला बाबा झाला
मी चांगली आई झाले का ?
माहित नाही l
त्याने मुलांना शिकवून खूप मोठे,
केले, ते आपल्या विश्वात रमले,
तो तसाच बिझी राहिला,
मी रिकामी झाले का ?,
माहित नाही l
त्याने मुलांना पंख दिले,
ते दूरदेशी उडून गेले,
तो म्हणतो मला,
मी आहे ना सोबत,
तो असताना पण,
मी एकटीच राहिले का ?
माहित नाही ll
