प्रेम असं असावं की...
प्रेम असं असावं की...
अगं ! काय करतोस हल्ली ... कशाला विचारतेस ?
तू दिलेल्या जखमानाचं भरू पाहतोय आजही ...
कितीही समजावलं त्या भाबड्या मनाला तरी ते ...
ती सध्या काय करते? हेच विचारत असत सारखं ..
काय केलीस ग तू जादू त्याच्यावर ? तुझ्या विरोधात
एक चकार शब्दही मला बोलू देत नाही ...अन ..
जाब विचारून म्हणतोय स्वतःलाच ... का छळतोस ?
ती तर गेलीय केव्हाच तुला सोडून तुझं .एकटं ..
एव्हाना ती विसावलीही असेल तिच्या घरट्यात ...
तू कसली वाट बघतोस ? तुझ्या समाधीवर तीन फुल वाहण्याची
की तुझ्या मूर्खपणावर हसण्याची की , तुझ्यावर थुंकण्याची ...
की वाट बघतोस या जगाने तुला वेडा ठरवण्याची ...
प्रेम हे एकट्या दुकट्याचं काम नाही ते दोघांच्या मनात रुजतं
प्रेम म्हणजे त्याग , समर्पण , ते तर दूर राहूनही करता येत
प्रेम असत सुंदर , मनभावन , जीवनदायी ..कुटुंबवत्सल ...
ती जिथे असेल तिथे सुखी असावी असं वाटणेही प्रेमच ...
प्रेमाचा शेवट कधीही गोड व्हावा , नाही सोबत तर नाही
उदार मानाने मैत्रीचा हात पुढे करावा . ते असत खरं प्रेम
एकतर्फी प्रेमातून तिला जाळणं , छळन म्हणजे फक्त वासना
प्रेम असं असावं की तिला खरचटलं जरी याच्या डोळ्यात टचकन पाणी यावं ...