प्रेम असावे प्रेमासारखे
प्रेम असावे प्रेमासारखे


प्रेम असावे प्रेमासारखे,
नकोत नुसता देखावा,
विसरून जग सारे,
मिठीत घ्यावा विसावा
त्या प्रेमाला अर्थ असावा,
नकोत नुसते वाद,
प्रेम जिव्हाळा तेथे असावा,
सुमधुर असावा संवाद
आपुलकीची भावना असावी,
नकोत कपट नीती,
दोन जीव एक व्हावे,
नको एकमेकांची भिती
चेहरा मनी एक असावा,
बाकी अमंगळ मुर्ती,&nb
sp;
राधाकृण्णासम प्रेम असावे,
व्हावे जगात किर्ती
शेवटपर्यंत साथ द्यावी,
नकोत नुसती वचने,
हात असावा हाती,
नको मृत्युपुढेही खचणे
प्रेमालाही अभिमान वाटावा,
नकोत तिरस्कार घृणा,
जन्मोजन्मीची प्रित असावी,
हेच प्रेम असावे पुन्हा.
𝕯𝕾