प्रेम आणि शोध
प्रेम आणि शोध
आपल्या भेटीआधी होतोच मी...
आपल्या भेटीनंतर ही आहे
आता मी तो ....नाही
मी... पाहायला तू नाहीस
तुझ्यावर " प्रेम" होतंच
नाकारायचा प्रश्न नाही...
दुरावण्याचा निर्णय तुझा
रोखण्याचा माझा हक्क नाही
काय असतं भविष्य सोबत
विचार सुद्धा येत नाही
नाही नाही तून भटकत होतो
" शोध "माझा संपला नाही
तुझ्या निर्णयाचा राग होता
आता काहीच उरलं नाही
आठवण आहेस "तू"
त्यापेक्षा जास्त असून चालणार नाही
तू येण्याचं निमित्त होतं
माझंच "मी" पण मला मिळायचं होतं
तितकीच तुझी कामगिरी होती
हे मात्र..मान्य करता येतं नाही

