प्रदूषण
प्रदूषण
प्रदूषणाच्या विळख्याने
बिघडत चालले आरोग्य
पर्यावरणाचे रक्षण करणे
हाच उपाय ठरेल योग्य||
उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा
विचार आजच करायला हवा
दररोज होणाऱ्या कचर्याला
वेळीच संपुष्टात आणायला हवा||
प्रदूषण करते सर्व जग दुषित
त्यामुळे काहीही नसते स्वच्छ सुरक्षित
हवा पाणी अन्नाचे प्रदूषण
येईल का आटोक्यात कदाचित
प्रदूषण करू नका लोकांनो
पृथ्वीला कष्ट देऊ नका
प्रत्येक व्यक्तीने संयम ठेवून
एकही झाड तोडू नका||
वसुंधरा देते आपल्याला निवारा
आधी इथले प्रदूषण आवरा
कुठेही कचरा करणार्यांनो
आधी आपला कचरा सावरा
झाडांची मैत्री तोडू नका
चुलीवर स्वयंपाक करू नका
प्रत्येकाने एक तरी झाड लावून
बायोगॅसला नाही म्हणू नका
एकत्रित येऊन प्रदूषण हटवू
निसर्गाला हिरवेगार करु
शुद्ध हवा हवी असेल तर
हा संकल्प सर्वांनी करु||
राग, मत्सर प्रदूषणाला
आधी दूर हटवू या
त्याग, संयम, आपुलकीने
सर्वांना आपण समजू या||
