प्रबुद्ध भारत (अभंग)
प्रबुद्ध भारत (अभंग)
ती भीम गर्जना | येवला सभेत |
ना हिंदू धर्मात | मरणार ॥ १ ॥
जन्म जरी नाही | घेणे होते हाती |
देतो मुठमाती | हिंदू धर्मा ॥ २ ॥
बाबासाहेबांची | भेट ती घेतात |
धर्म सांगतात | धर्मगुरू ॥ ३ ॥
बुद्ध धम्म असे | मुळ भारताचा |
स्विकार हा त्याचा I नागपूरा ॥ ४ ॥
बुध्द आणि धम्म I ग्रंथ तो घडला I
आकार मुर्तीला I बुध्द रुप ॥ ५ ॥
प्रबुद्ध भारत I बाबासाहेबांचा |
बुद्धच जगाचा | दीपस्तंभ ॥ ६ ॥
