प्रासंगिक जिजाऊ
प्रासंगिक जिजाऊ
स्वराज्याचा इतिहास कसा घडला असता ?
जर स्वराज्याला जिजाऊचा आसरा मिळाला नसता.
कोनी शिवाजी खरचं मावळ्यांचा छत्रपति झाला असता ?,
जर स्वराज्याला जिजाऊचा आशिर्वाद मिळाला नसता.
आपल्या पुत्राला जनसेवक घडवू शकते कां आजची माता,
पति-पुत्राचा स्वराज्यासाठी बलिदान देवु शकते कां आजची माता.
शिवाजींच्या सोबत्याना पुत्रतुल्य मानते कां आजची माता,
शत्रु सोबत युध्द करायलां शिकवते कां आजची माता.
आत्मसम्मान,स्त्रीसंरक्षण, न्याय, समानताचे पाठ,
आपल्या पुत्राला शिकवते कां आजची माता.
सर्वधर्मभाव, धर्मनिरपेक्षता विश्र्वबंधुत्वाचे पाठ,
आपल्या पुत्राला शिकवते कां आजची माता.
जर इतिहासाची पुनरावृत्ती आजहि घडली असती,
तर जिजाऊची उणीव आज स्वराज्याला भासली नसती.
देशत जे काही घडत आहे ते झाले नसते,
जर आजच्या मातेनी शिवाजी सारखे पुत्र घडवले असते.
म्हणूनच आजही जिजाऊची शिकवण अनमोल वाटते,
म्हणूनच जिजाऊचे विचार आजही प्रासंगिक वाटते.
