पराक्रमी होळकर...
पराक्रमी होळकर...


शिवाजी महाराजांच्या मावळ प्रांताचे
पहिले सुभेदार मल्हारराव होळकर
धनगर समाज परिवर्तन घडवणारे
राजकारणी, मुत्सद्दी नि पराक्रमी वीर
कुटुंबातील सती प्रथेचा केला बिमोड
साताऱ्यातील होळ गावी सर्वा सन्मान
>
स्वराज्यासोबत कुळ रक्षिले राखून
रणभूमीत उच्च श्रीमंती मराठा शान
दाही दिशा पवित्र महाराष्ट्र भूमीच्या
तलवारीच्या विजयश्रीने गाजविल्या
पहिलाच तो पानिपती पराभव पचवून
कारभारी धीर तलवारी उरात भरल्या