STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

पराक्रमाची धुरा

पराक्रमाची धुरा

1 min
28.2K


पराक्रमाची धुरा सांभाळली

राणीलक्ष्मी वीर झाशीवाली

स्वाभीमान तिचा सर्वां

रणांगणात लढली ती शौर्या वीरांगना

स्त्रीशक्तीचा सलाम वीरांगनाला


शिक्षणाचा घेतला ध्यास

ज्योतिंबासवे सावित्रीने

लढली जनांबरोबर

जिंकले जनसमुदायाला

मानली नाही सावित्रीने हार

स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रोवला

स्त्रीशक्तीचा सलाम सावित्रीला


स्वराज्याच्या ध्येयाचा घेतला ध्यास

राज्यकारभाराचे शिक्षण दिले जिजाईने शिवबास

लढावू वृत्तीला खतपाणी घातले

त्या मायमाऊलीने ,रणरागीणीने

स्त्रीशक्तीचा सलाम त्या स्वराज्याला,जिजाऊला.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational