प्राजक्त
प्राजक्त
प्राजक्ताचा मूक त्याग
कधीच कुणाला कळला नाही,
झाडावरून अलगद मातीवर पडला
पण तो कधीच मळला नाही !
कळीचे उमलून फूल झाल्याशिवाय
फांदीवरून तो गळला नाही,
विरागी वृत्तीने सुगंध लुटवण्याच्या
आपल्या व्रतावरून कधी ढळला नाही!
