STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

प्राजक्त

प्राजक्त

1 min
256

पहाटेची चाहूल लागताच 

 गारवा खास गंधाळला  

अंगणी प्राजक्त फुलांचा 

 सडा पडताच

 मंद परिमळ सुगंध सर्वत्र दरवळला  


गंध वेड्या सुगंधाची होता बरसात

 दरवळून जाते सारे अंगण  

प्रसन्न वाटून बेधुंद होते जसे मन 


 गंध अलौकिक याचा 

क्षणभंगूर असे जीवन  

रंग गंधाने याच्या होतो 

सुखाचा आभास  

ओठावरती अलगद हसू आणतात 

या शुभ्र फुलांची आरास☺️


 फांदीवरून ओघळतांना 

मातीलाही सुगंधित करतो  

छंद समर्पणाचा आगळा याचा, 

किती अलगदपणे जपतो😊 


प्रातःकाळी बहरलेला प्राजक्त

 दुपारी कोमेजुन जातो  

आयुष्य जरी एक दिवसाचे 

काम लाखमोलाचे 

 सुखदुःखाची थोर महती 

मर्म या जीवनाचे जगताना आपणास सांगून जातो


 मैत्री, नाती व्हावी अशीच  

जिवाला जीव देणारी 

जीवन असे सार्थ व्हावे 

प्राजक्त फुलापरी 

 

घेऊन शिकवण आपण 

या फुलांकडून 

सुख दुःखं वाटुन घेऊ सर्व 

मिळून आयुष्यात असेल 

आपल्याही सुगंध

 दृढ होतील तेव्हाच ऋणानुबंध😊 


 उघडून बघितले मनाचे द्वार व्हावेसे वाटले थोडेसे व्यक्त

बघितला जेव्हा अंगणी फुललेला हा प्राजक्त...🌸🌼 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational