पोवाडा-लोकराजा
पोवाडा-लोकराजा
चला चला हो करु या वंदन
लोकराजा तुला रं ||
जी s जी s रं जी
दिलास आम्हा न्याय आणि
दिलीस आम्हा समता हो s
जन्मलास तू घाटगे घराण्यात
नाव तुझे यशवंत हो s
वडील तुझे आप्पासाहेब अन्
आई तुझी राधाबाई होsss||
जी s जी s...
बहुजन समाजात शिक्षण प्रसार अन्
शिक्षण केले मोफत न् सक्तीचे हो s
स्त्री शिक्षणाचा प्रसार केला अन्
केला जाती भेद हा दूर हो s
आंतरजातीय विवाहाला दिली मान्यता,
पुनर्विवाहाचा केला कायदा हो ss||
जी sजीs.....
एकत्र केले शिक्षण अन्,
काढल्या शिक्षण संस्था होs
शेतकऱ्यांना कर्ज देणे अन्,
केला कृषिविकास हो s
'राजर्षी'ही पदवी अन्,
दलितांचे कैवारी होss||
जीsजीs....
सामाजिक न्यायाचे महत्त्व जाणूया,
छत्रपतींना हेच वंदन हो s||
जीsजीsरं जीs......
लोकराजा तू रं, शाहू राजा तू रं......जीs.....