पोटासाठी
पोटासाठी


कशासाठी पोटासाठी
रोज आटापिटा चाले
भूक पोटात असता
जग दिसेनासे झाले
टिचभर पोटासाठी
रोज चाले धावाधाव
ऊन पावसात नाही
घेत थांबायचे नाव
गेले विसरून खेळ
खेळायचे अंगणात
पोटासाठी राबतात
बघा चिमुकले हात
तान्हे बांधून पाठीशी
माय राबते शेतात
बाळ रडाया लागता
पान्हा फुटतो ऊरात
किडे मुंग्या पशू पक्षी
धावतात अहोरात्र
कशासाठी पोटासाठी
हाच जपतात मंत्र