पोट
पोट
1 min
466
काय देवा असं
मीच केल पाप
माझ्या नशिबाले
कारे असा व्याप ।।
जन्म दिला मला
गरीबाच्या घरा
म्हणून कारे तुझा
नाही मला सहारा ।।
गेले देवा थकून
रोज वेचून कचरा
नाही कळत मला
किती मारते चेकरा ।।
देवा मलाच का
असं दिलं पोट
दिसभर फिरुन
नाही मिळत नोट ।।
जीव कंटाळला
सहन करून वास
या दुर्गधिन मला
गिळत नाही घास ।।