STORYMIRROR

Pappu Tekale

Classics Inspirational Others

3  

Pappu Tekale

Classics Inspirational Others

पण तुला तर जगावंच लागेल

पण तुला तर जगावंच लागेल

1 min
207

कधी खूप दुःख दाटून येतील

कधी शब्द कंठ फुटून येतील

संपेल ही तुझ्या जवळचे सारे

जवळचे नातेही तुटून जातील

त्यातून तुला सावरावच लागेल

पण तुला तर जगावंच लागेल...


रडुन घे मानसोक्त आतून तू

पण वरून ठेव चेहरा हसरा

आयुष्य तुझं पांगुन जाईल

जसा पांगतो घराचा पसारा

तुला रे ते अवरावंच लागेल

पण तुला तर जगावंच लागेल


आयुष्य इतकही स्वस्त नाही

की खुशाल लटकून घ्यावं

दुःख असले जरी आयुष्यात

तरी का जगणं सोडून द्यावं

खरं सुख तुला शोधावच लागेल

पण तुला तर जगावंच लागेल


अंधाराला घाबरलास जर तू

उजेड तुला रे दिसेल कसा...

तिमिरातून तेजाकडे जाणारा

तो रस्ता तुला गवसेल कसा...

तिमिरातून प्रकाशाला यावचं लागेल

पण तुला तर त्यासाठी जगावंच लागेल...

जगावच लागेल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics