पावसा तू
पावसा तू
हे बरसणाऱ्या पावसा तू
काळजात माझ्या आग लाऊ नकोस..
ती नाही रे आता माझी
उगाच जखमेवर मीठ चोळु नकोस..
माझं इंगित तुला असेल रे ठावं
तिला रे ते कधी कळालंच नाही...
तूच होतास भेटीचा साक्षीदार
तुला ही वाटतं ते आवडलंच नाही...
चुटक्याचे मांडव बांधले रे तीने
त्याला तू तरी आता भाळू नकोस..
उगाच जखमेवर मीठ चोळु नकोस..
तू जेव्हा जेव्हा असा बरसतोस
पुन्हा त्याच आठवणी जन्म घेतात..
ती ढालगजभवाणी पुन्हा आठवते..
अन आठवणी त्याच झडीत नेतात..
तुझ्या झडीत मी भिजत राहतो
त्यात पुन्हा तुझा जोर वाढवू नकोस...
उगाच जखमेवर मीठ चोळु नकोस..
