STORYMIRROR

Pappu Tekale

Romance Inspirational

3  

Pappu Tekale

Romance Inspirational

प्रेमात तर सर्व काही माफ असतं.

प्रेमात तर सर्व काही माफ असतं.

1 min
434

प्रेमात तर सर्व काही माफ असतं...

ना वयाचं बंधन ना कोणतं माप असतं...

प्रेम कुणावर करावे हे हृदयावर असतं...

आणि हृदय तर तिच्याच नावावर असतं...

कारण प्रेमात तर सर्व काही माफ असतं..

प्रेम हे लग्न झालेल्यां प्रेयसीवर ही असंत...

थोडं नवर्यावर नी थोडं त्यांच्यावर ही असतं...

लोकांपासून लपवून पण ते चालूही असतं...

कारण प्रेमात तर सर्व काही माफ असतं..‌.

कुणाच्या हृदयासाठी कुणाचे हृदय मोडतं...

एकाला धोका अन् एकासोबत नातं जोडतं...

कोण कुठली ती त्यात काही घेणं देणं नसतं...

कारण प्रेमात तर सर्व काही माफ असतं...

कधी कधी प्रेमात कुणाच्या रक्त ही साडतं...

कुणीतरी त्यात समाजाचा बळी ही ठरतं...

क्षणभर प्रेमासाठी कुणी आयुष्य ही सोडतं...

कारण प्रेमात तर सर्व काही माफ असतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance