STORYMIRROR

Pappu Tekale

Others

4  

Pappu Tekale

Others

कविता...

कविता...

1 min
10

 कविता...
सत्य बोलण्या कविता कधी मुकत नाही...
सत्तेपुढे तर कविता कधीच झुकत नाही...

मांडतील बाजार इथे दलाल सारेच मिळून
पण बाजारात कविता कधीच विकत नाही..

टाकतील इथे कुणी कुणाच्या कवितेवर नावे...
कारण कविता इथे कुणसाही जमत नाही...

जुळेल हो जुळवील्यावर कुणालाही यमक...
पण भावना मात्र इथे कुणासही जुळत नाही....

किती दुःखे झेलली असतील त्या कवीने...
उगाच काळजाला भिडणारी कविता सुचत नाही

तिच्यापेक्षाही जास्त आवडते मला कविता
कारण कविता माझ्यावर कधीच रुसत नाही..

कुणीच ओळखत नाही माझ्या फक्त नावाला
पण कवितेमुळे ओळख माझी कुठे पुसत नाही...

 मेल्यावरही कविता माझी जिवंत राहील
माणूस गेल्यावर शिल्लक काहीच उरत नाही..

समजून उमजून घ्यावी लागत असते कविता फक्त वाचून कविता कधीच कुणा कळत नाही...

पप्पू टेकाळे.. ✍️


साहित्याला गुण द्या
लॉग इन