पाऊस हा पुन्हा आला...
पाऊस हा पुन्हा आला...
पाऊस हा पुन्हा आला
अन् जागल्या आठवणी...
तु माझी आणि मी तुझा
सांगे तो आपल्या थेंबातून..
जाताच तोही आठवणीही जातात..
येताच पुन्हा तुलाच घेऊन येतात...
जेव्हा जेव्हा आलं भिजण्यास नेलं..
तुझ्या मिठीत मला घेऊन जातात
कधी दिसशील मला कधी भेटशील मला..
सांगतात ह्या सरी घे तुला भेटूनी
पाऊस हा पुन्हा आला
अन् जागल्या आठवणी...
तू माझी आणि मी तुझा
सांगे तो आपल्या थेंबातून...

