STORYMIRROR

Pappu Tekale

Others

3  

Pappu Tekale

Others

या वाटेचा मी वाटसरू..

या वाटेचा मी वाटसरू..

1 min
244

या वाटेचा मी वाटसरु..

ही वाट खूप दूर जाते

सोबत ना कुणी माझ्या

रिकामीच माझी हाते..

सोबत भेटेल ना कुणी

देईल मी त्याला साथ..

सोबत चालत राहील

नकोना उद्याची बात..

येथील वादळे हे पण

सोडायचा नाही रे रस्ता..

अशा वादळाला आपण

घाबरायचं नाही रे दोस्ता..

येतील आडवी वळणे

असेल तिथे सारा गस्ता..

तू भिऊ नको रे कधीच

संकटे ही उठता-बसता..


Rate this content
Log in