STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

4  

Chandanlal Bisen

Inspirational

पंख फुटले स्वप्नांना

पंख फुटले स्वप्नांना

1 min
194

धरातली जन्म घेतानाच

होतो सुरू जीवन प्रवास

रुजती आसक्तीचे बीज 

उपजती मोहरूपी आस..


अनेक आशा अभिलाषा

मनात शृंखलाच विस्तृत

मनमोहक स्वप्नात दृश्य

मन रमतोया सुंदर वस्तूत..


मनास ब्रह्मांडीक मुभा

विचरण करीतो स्वप्नात

सूर्य, चंद्र, तारे, आणिक

भ्रमंती करी काही क्षणात.. 


कधी गरुडापरी झेप घेई

कधी भक्त पवनसुतापरी

जशा कल्पना येती मना

क्षणात वस्तू प्राप्त करी..


पंख फुटल्यागत प्रचिती

स्वप्नांच्या रंजक दुनियेत

पंख फुटले माझ्या स्वप्नांना 

वास्तविकतेच्या दुनियेत..


पंखात बळ निर्माण करू

ध्येयांकीत श्रम करूनी

उडान घेऊ अवकाशात

एकाग्रतेची मशाल धरुनी..


जागृतावस्थेत बघा स्वप्न

उघडा द्वार सुंदर यशाची

प्रेरणा शक्ती चला जागवू

खाण खोदू कर्म रहस्याची..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational