पळसाला पानं तीन
पळसाला पानं तीन
कुठंही जा ....
पळसाला पानं तीन....
ऐकत ऐकत मोठी झाले...
ह्या वाक्याचा अर्थ...
हळूहळू उलगडत गेला....
मोठ्या ताईचे लग्न झाले ...
सासूरवास नको म्हणुन...
थेट माहेरच गाठले...
तीला पाहता क्षणीक...
आजीने शब्द पुटपुटले...
कुठे ही जा पोरी...
पळसाला पान तीनच....
शाळा संपली आता काॅलेज सुरु होणार
म्हणुन मी आनंदले...
पण पोरगी शहाणी झाली..
लग्न टाका उरकून...
मी लग्न करणार नाय... मला शिकायचं हाय....
त
ेंव्हा मात्र
आजोबा म्हणाले....
पोरगी म्हणजे परक्या च धन...
कारण पोरी कुठेही जा...
पळसाला पान तीनचं.....
लग्न करुन सासरी गेले...
राजाराणी चा संसार ....
मनात फार आनंद झाला...
पण काय ... चुकलं काय माहीत ...
नव-यान खुप हानलं...
काय सांगु ... पळतच माहेरी सुटले..
घरात सगळ्यांनी पाहीलं ..
आणि एक दमात म्हणाले...
कुठ ही जा....सुमने....
पळसाला पान तीनचं...
नवरा बायकोचं भांडण...
हाच तर खरा संसार....