फुलराणी
फुलराणी
आली फुलराणी घरी
निरागस, लोभस
गोडवा
चेहऱ्यावर
बघताच साऱ्यांचे
नयन आनंदाने भरी
वाऱ्यासंगे घेई फुलराणी
झोक्यावर बसुनी
हेलकावे
छान
मोहक हास्य
करी गुणगुणत गाणी
पाककलेची आहे आवड
करी सजावट
घर
स्वच्छ
ठेवून छंदही
जपे काढुनी सवड

