STORYMIRROR

Suvarna Patukale

Inspirational

4  

Suvarna Patukale

Inspirational

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
351

काल उडता उडता एक

फुलपाखरू माझ्याशी बोललं

बोलता बोलता रंगाचं

गुपित त्यानं खोललं !


मी विचारले...........

तुझ्याजवळ इतके रंग कुठून आले

गाली हसत हसत त्याने

मला एक उत्तर दिले

माझा एक छंद आहे

फुला फुलांवर उडण्याचा

त्यांच्याशीच गोष्टी करत

रंगांमधे गढण्याचा

तसं झालं की येतो रंग

थोडा माझ्याही पंखांना


रंगबिरंगी पंख पाहून

उधाण येतं शंकांना

तुला सांगतो.........


तू ही घे, फुलांकडून थोडा रंग

पहा त्यांच हसरं रूप

सुवासात होऊन दंग

मग तुलाही विचारेल कोणी

तुझ्या रंगांचं गुपित

माझ्यासारखं तू ही सांग

ठेऊ नकोस कुपीत

बघ तू ही एकदा तुझ्या

मनातलं गाणं गाऊन

जग क्षण अन् क्षण

आनंदाच्या रंगांमध्ये नाहून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational