STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Children

4  

Ganesh G Shivlad

Children

फुलपाखराची शाळा

फुलपाखराची शाळा

1 min
716


फुलपाखरू एक रंगीत,

मला भेटले आज बागेत..!


खेळून खुप फुलांभोवती,

बसले फांदीवर ऐटीत..!


करून मैत्री मला म्हणाले,

येशील का रे माझे सोबत.?


जाऊ दूर आपण उडत,

फुलपाखरांच्या त्या शाळेत..!


होऊन आनंदी मी म्हणलो,

हो येणार मी तुझ्या सोबत..?


पण उडू कसा तुझ्यासंगे,

नाही पंख मजला पाठीत..?


फुलपाखरू म्हणाला मित्रा,

झाक डोळे तू बैस निवांत..! 


माहीत आहे जादु मजला,

लावीन पंख तुला पायात..!


झाकून डोळे असा बसलो,

जुळले पंख मला क्षणात..!


गेलो उडत शाळेत त्याच्या,

शिकलो गोष्ट छान गाण्यात..!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children