फुलांच्या गावात
फुलांच्या गावात
छान छान छान
माझी बाग किती छान || धृ ||
रंगात रंग फुले सुंदर
ऐटीत झुलती छान
फुलांचा राजा गुलाबी
लाल पिवळा रंग छान || १ || धृ
मोगरा फुलला सकाळी
सुगंध वारा नमन भूपाळी
पांढरा रंगाचा पिसारा
चहुकडे दाखवी शान || २ || धृ
फुलचुखींची नवी नवलाई
रंगात रंगून गाणे गान
फुलांच्या गावी जाऊन
रंग भरूया चित्रे छान || ३ || धृ
