फुकणी
फुकणी
ओलं चिंब सरपण
बाई गं पेटता पेटना
घाली चुलीत लाकडं
बाई ढोसता ढोसना
जेव्हा आईचे डोळे
लागे घळघळा धारा
धुराने लालबुंद झाले
तेव्हा फुकणी सहारा
फुकणीने चुलीत घाली
फुंकरने पोटातली हवा
ढणाढणाच शिलगली
चुल बाई पेटली तवा
स्वयंपाक होतोच छान
बांबूची की लोखंडाची
बायका म्हणतात खरी
फुकणी ही लई कामाची
