STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract Others

4  

Suhas Bokare

Abstract Others

फसवणूक

फसवणूक

1 min
422

मित्र बनूनिया, वैरी आले, फसवे सारे आले.

वादळ स्वतःच, सांगे खोटे , वदले वारे आले.


त्या बिंदूला, मनात माझ्या, छान फुलोरा होता.

विषाक्त फुहार, करावया मग, धावुन का रे आले?


तारा पडतो, असे ऐकले, इच्छा पूर्ती होते.

त्या रात्रीला, पृथ्वीवरती, अमाप तारे आले.


फेकत अदृश्य, मायाजाळं, फसवून रात्र गेली.

जाळ्यातल्या, धाग्यांच्याही, गिर्द शहारे आले.


पटलावरती, खेळ मांडला, एकतर्फीच होता.

भाला माझा, सरसावला नि, कडक पहारे आले.

======



రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Abstract