फणस चिप्स..!
फणस चिप्स..!




चौदा जून(14)
पाचवा लॉकडाऊन
चौदावा दिवस समंजस सांज...!
चौ दा विद्या, चौसष्ट कला
दा वणीला बांधल्या
वा टलं जग जिंकलं
दि वसाढवळ्याच डोळ्यांचं पारणं फिटलं...!
व जावट कामांची होता
स हज दोनचार काम वाटणीला आली
स गळं सोडून फणसाचे चिप्स तळण्याची पाळी
मं तरल्या सारखी
नशिबात थट्टेने अंगावर आली...!
ज रा धीर धरला
स र्व शिवधनुष्य सहज पेलले
सां गून सवरून मस्तपैकी
ज रा जपूनच चिप्स तळले....!
पार पडली परीक्षा
समंजसपणाच्या जोरावर
खाता खाता नाचू लागली मित्रमंडळी
आनंदात यशाच्या मोरावर....!
शुभ सायंकाळ...!