फळा
फळा
एक होता फळा
तो होता काळा,
खडूने काढल्या
त्यावर अक्षरमाळा...||१||
अक्षरे मुलांना
बोलू लागली,
पाहून त्यांना
हसू लागली...||२||
अक्षरे पाहून
मुले शिकली,
लिहायला,वाचायला
अन बोलायला शिकली...||३||
रोज रोज फळा
करू लागला गमती,
पाने,फुलांबरोबरच
चित्रांच्या जमती...||४||
वेगवेगळ्या गमतीने
मुले लागली शिकू,
भारी भारी गोष्टीसंगे
पुस्तक लागली वाचू...||५||
