साथ सख्याची
साथ सख्याची
कश्या कुठे जुळल्या
आपुल्या रेशीमगाठी,
उष:प्रकाशाच्या जोडीची
झाल्या जन्मोजन्मीच्या गाठी..
कोण अन कुठे होतास
तरीही भेटलास मला,
क्षणात पाहून गेलास
अन हवीशी वाटले तुला..
रितिभाती अन परंपरेने
विवाहबंधनात अडकलो,
संसाराच्या भवसागर
पार करण्या निघालो..
अनुभव आले कित्येक
दुःखही अपार झेलली,
पण एकमेकांच्या साथीन
ती हसतच पेलली..
आधार फक्त एकमेव
तुझाच तो होता,
येईल आपुला क्षण कधीतरी
मनात 'प्रकाश' चा किरण होता..
कित्येक दिवस उलटूनही
दिवस नाही 'ते' दिसले,
सर्वांचे सर्व करूनही
आपुले कोणी न उरले..
तू मात्र कायम
खंबीर साथ दिलीस,
म्हणून तर आज 'प्रकाशा' च्या जोडीला
'उषा' कायम दिसली

