STORYMIRROR

Usha Dhere

Others

3  

Usha Dhere

Others

पांडुरंग

पांडुरंग

1 min
168

पांडुरंग माझा | उभा विटेवरी

कर कटेवरी | ठेवुनिया ||१||


सदासर्वदा तो | करतो रक्षण

करण्या भक्षण | संकटाचे ||२||


दुःखी पीडितांची | तीच एक आस

तोच एक श्वास| भक्तगणा ||३||


माथा टेकवुनी | समाधान होते

चित्त स्थिर होते | तुझ्या पायी ||४||


वेडे भक्त आम्हीं | विठूराया तुझे

नाम ओठी तुझे | पांडुरंग ||५||


सावळ्या विठ्ठला | रूप तुझे मनी

 सदा ध्यानीमनी | एकच तू ||६||


Rate this content
Log in