STORYMIRROR

Usha Dhere

Inspirational

3  

Usha Dhere

Inspirational

गुरूचा महिमा

गुरूचा महिमा

1 min
222

गुरूचा महिमा मी

वर्णू काय आज,

ज्याने चढविला मस्तकी

माझ्या आनंदाचा ताज...||१||


आई-वडीलच माझे

जीवनाचे पहिले गुरू,

त्यांच्यामुळेच झाले

माझे आयुष्य सुरू...||२||


जन्मापासून घडविले मज

देऊन शिक्षणाबरोबर संस्कार,

 कशानेच नाही त्यांचे फिटणार

 सात जन्मीही उपकार...||३||


 समृद्ध जगण्याबरोबरच 

 माणुसकीची शिदोरी दिली,

स्वतःच्या सुखासोबतच इतरांसाठी

झटण्याची शिकवणही दिली...||४||


माझ्या गुरूंचा मज

नेहमी वाटतो हेवा,

त्यांच्या शिकवणीचा मनात

नेहमी जपणार मी ठेवा...||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational