'तू' आणि 'मी'
'तू' आणि 'मी'
संसाराची दोन चाक
सख्या तू आणि मी,
कितीही वादळे आली तरी
सख्या साथ देणार मी..
जीवनात कितीही दुःख येऊ देत
डगमगनार मी नाही,
कोणी कसेही वागू देत
सख्या साथ सोडणार नाही..
संसारात रमले मु
सख्या 'फक्त' तुझ्या साथीन
तुझीच साथ मिळाली पावलोपावली
माझ्या प्रत्येक हाकेन..
तुझ्या सोबतीनं सख्या
प्रत्येक कामात बळ येतं,
तुझ्यामुळेच माझं
प्रत्येक कामात पाऊल पुढं पडतं
दुःख कितीतरी आले गेले
झळ त्याची कधी न पोचली,
तूच झेललीस खंबीर होऊन
मला मात्र नाही कळू दिलीस..
आयुष्यात काहीही नको
फक्त तुझी साथ हवी,
सोबत एकमेकांची असताना
जगायला मिळते ऊर्जा नवी..
तू अन मी सोबत असताना
काहीच कमी नसेन
संसाराचा गाडा ओढताना
सख्या तू तिथं मी दिसेन..

