Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Usha Dhere

Children

3  

Usha Dhere

Children

किलबिल

किलबिल

1 min
177


कुठे गेला तो किलबिलाट

का मित्रांचा डाव मोडला?

का कोरोनाने चिमणीपाखरांच्या

खेळ जीवाशी मांडला?...||१||


बागेतील किलबिलाटाने

मन कसे प्रसन्न होते,

सुन्न झाले सारे आता

आवाजाविना मुके झाले...||२||


नाही कुणाचे डिवचणे येथे

नाही कसले भांडण,

कुठेच नाही ढकलाढकली

नुसतेच रिकामे जाणे...||३||


रंगविल्या भिंती जरी

डोळ्याची उत्सुकता नाही,

"बाला"ने शाळा नटली

तरी पहायला बालक नाही...||४||


कश्याला नुसत्या बोलक्या भिंती?

बोलणेच इथे नाही,

कुणास बोलावे इथे

कळेना कुणा काही...||५||


जातील हेही दिवस

उगवेल सूर्य आशेचा,

उजळतील दाहीदिशा

तेजस्वी किरणांनी उषेच्या...||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children