फक्त स्वप्न
फक्त स्वप्न
ओठावरचे तुझे ते स्मित हास्य
मन माझे मोहरुन गेले
ऋतु राजाच्या आगमनाने
रान सारे बहरून गेले
तु येण्याची चाहुल लागली
संदेश दिला पाखरांनी
कोकीळा गाऊ लागली
स्वप्न होती ती रंगवलेली
आज अचानक घडु लागली
हृदयाचे स्पंदन वाढले
तुझ्या भेटी करिता
नेत्र माझे अतुर झाले
रविराजाचे तांबडे फुटले
तेव्हा स्वप्न माझे विखरुन गेले
हो .. ते फक्त स्वप्नच होते..
ज्यात तुझे सौख्य लाभले
हो.. ते फक्त स्वप्नच...

