STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

2  

Manisha Wandhare

Abstract Romance

फक्त माझे भास उरावे...

फक्त माझे भास उरावे...

1 min
4

राधे तुझ्या पैजंणाचा नाद खुळा ,

ऐकुनी मन झुळूक वाऱ्याचे व्हावे,

तुझ्या अवतीभवती घालून पिंगा ,

रोमरोमांत अलगद भिनावे...

विसरूनी स्वतःला तुझ्यात,

फक्त माझे भास उरावे ,

जीवन माझे तुला समर्पित ,

जीवनाला प्रेमाचे अर्थ कळावे ...

दुःख या वाटेत जरी ,

तरी सुखाचे सोहळे सजावे ,

प्रेम हे फुलपाखरू मनाचे ,

घट्ट मुठीत ना आवळावे ...

यमुना तीरी तुझी रागिनी,

मंजुळ गाणी ऐकत बसावे ,

बासुरीचा छेडूनी सुर नवा ,

नव्या आठवांना साठवावे ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract