STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

पहिल्‍या पावसाचा गंध

पहिल्‍या पावसाचा गंध

1 min
279

सुरुवात झाली हळूहळू 

टप टप पावसाच्या थेंबाने, 

सुगंध दरवळला सर्वत्र 

मन चिंब झाले जल स्पर्शाने..१ 


तप्त धरणीस तृप्त केले 

शांत शितल जल धारेने,

लाही लाही झालेला परिसर 

थंड झाला मंद गारव्याने..२


कोसळे धडाधड सरीवर सरी 

चोहीकडे खेळे पाणीच पाणी, 

तना मनाने आसुसलेली सृष्टी 

भिजण्यास सज्ज निसर्ग रानी..३ 


पहिल्‍या पावसाचा गंध 

दिसून येई चरा चरातून, 

नटली सजली धरणीमाता 

पावसाच्या आगमनातुन..४


हिरवाईचे रूप खुलले 

झाडे वेली हसू लागले, 

धन्य झाले पशुपक्षी 

वन्यजीव ही मस्त रमले..५ 


सडा पावसाचा अंगणी 

मन मधुर होऊन गायले, 

टप टप थेंबाच्या नादाने 

छन छन पाय नाचू लागले..६ 


रोमांच झाली उष्ण काया 

आज पावसात भिजून, 

धरती निसर्ग डोलत राहे 

माझ्यासोबत दंग होऊन..७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational