STORYMIRROR

Smita Murali

Romance

4  

Smita Murali

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
5.4K


पहिलं प्रेम


रसरसलेल्या लावण्यात

तारुण्यातलं पहिलं पाऊल

दिवास्वप्नांचा मनास लळा

प्रेमभावनेची लागली चाहूल


भिरभिरणारी नजर माझी

तुझ्या तारुण्यावर फिदा

प्रतिबिंब साठलं डोळ्यात

मंतरली तुझी सखी राधा


मनातली अनामिक ओढ

चंचल बनले माझे डोळे

तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव कानी

हरखून गेले मन हे भोळे


सोडून लगाम जनामनाचा

प्रेमाने डोळ्या बांधली पट्टी

आंधळं पहिलं प्रेम माझं

माझ्या सारखंच होत हट्टी


पहिल्या प्रेमाची नशाच भारी

मोहमयी मखमली प्रेमनगरी

हात गुंफूनी हातात प्रियाचे

घ्यावी वाटली गगनभरारी


कृपा म्हणावी भगवंताची

पहिलं प्रेमच माझा जीवनसाथी

मनास जुळली तार मनाची

सौभाग्य गोंदण सजलं माथी


प्रभुचरणी मागते मागणं

स्वर्गात जेंव्हा बांधशील गाठी

पहिलं प्रेम मिळावे जीवनी

प्रभू!असा वर दे प्रेमिकांसाठी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance